उद्दिष्टे

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक भूतकाळाची योग्य माहिती देऊन पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक दृष्टिकोन यांची सांगड घालणे हे ट्रस्टचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच कोणत्याही भेदाभेदाचा विचार न करता सर्वच क्षेत्रातील ज्ञान प्रामुख्याने स्थानिक भाषेत अर्थात् मराठी भाषेत देणे हा ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. संस्कृत भाषा, इंडोलॉजी आणि इतर संबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये स्वारस्य निर्माण करणे आणि ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांद्वारे इच्छुक सहभागींना योग्य आणि अद्ययावत ज्ञान देऊन संस्कृत, प्राचीन भाषा तसेच अन्य विषयातील ज्ञानग्रहणासाठी प्रोत्साहन देणे. प्राचीन भारतीय ज्ञानातील संशोधन कार्यांना प्रोत्साहन देणे. जसे : संस्कृत आणि इंडोलॉजी क्षेत्रातील सर्व विषयांवर आधारित चर्चा आणि परिषद, कार्यशाळा, व्याख्याने इ. भाषेचा विकास आणि प्रसार करण्यासाठी प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम - नाटक, नृत्य, संगीत, उत्सव आणि मैफिली, सेलिब्रिटींच्या मुलाखती, जीवनशैलीशी संबंधित उपक्रम - योग शिबिरे, ध्यान शिबिरे इ. आयोजित करणे.

ध्येय

संस्कृत आणि प्राचीन भाषा आणि साहित्यातील उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे भारतीय परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करणे. उच्च दर्जाचे ज्ञान प्रदान करणे आणि त्या त्या क्षेत्रातील प्रचलित अद्ययावत माहिती आणि नवीनतम संशोधनाचे प्रवाह समोर आणून लोकांना संशोधनासाठी प्रेरणा देणे.