व्याख्यानमाला, कोल्हापूर

व्याख्यानमाला सुरु करताना जिथे असे उपक्रम राबवले जात नाहीत तिथे असा उपक्रम घेण्याचे ठरवले. त्यानुसार पहिली दोन व्याख्याने आयोजकांच्या घरीच घेण्यात आली. त्यानंतर कोल्हापुरातील प्रसिद्ध "ब्राह्मण सभा करवीर" या संस्थेशी संपर्क केल्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून संस्कृत विषयाशी निगडित विषयांची एकूण २१ व्याख्याने घेण्यात आली. या व्याख्यानमालेमध्ये संपूर्ण भारतातील त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.