देवा तूंचि गणेशु

गणपतीच्या निमित्ताने “देवा तूंचि गणेशु” या नावाने दोन व्याख्याने घेतली. ज्यामध्ये गणपती अथर्वशीर्षाचा विषय आणि आशय व गणपतीच्या विविध पूजा व त्यामागील विचार यावर व्याख्याने देण्यात आली. श्री. प्रणव गोखले हे मूळचे चिपळूण येथील असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत विभाग येथून संस्कृत विषयातून एम्.ए. केले आहे. तसेच ते संस्कृत विभाग येथूनच संस्कृत विषयामध्ये पीएच.डी. करत आहेत. सध्या ते पुण्यातील वैदिक संशोधन मंडळ येथे सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत आहेत. तसेच श्री. गोखले हे कीर्तनकार, प्रवचनकार आणि व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असून भारतीय संस्कृतीशी निगडित अनेक विषयांवर ते व्याख्याने देतात.