नेट पेपर (संस्कृत) : व्याकरण विभाग वर्ग

नेट कार्यशाळेत सहभागी झालेल्या काही विद्यार्थ्यांची व्याकरण विभाग समजून घेणे अवघड जात असल्याचा अभिप्राय मिळाला. तसेच या विद्यार्थ्यांनी ७ दिवसीय व्याकरण विभागावरील कार्यशाळा आयोजित करण्याचा आग्रह धरला. विद्यार्थ्यांच्या विनंतीचा मान ठेऊन मुंबई येथील डॉ. निलेश जोशी यांची व्याकरण विभाग कार्यशाळा आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ७ दिवसीय कार्यशाळेचे दिवस वाढवावे लागले.