नेट-सेट पेपर १ : एकदिवसीय कार्यशाळा

संस्कृत तसेच सर्व विषयातील नेट-सेट परीक्षार्थींसाठी पहिल्या पेपरची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक श्री. आशिष सांगळे लाभले होते. श्री. आशिष सांगळे हे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून तत्त्वज्ञान विभागामध्ये नेट-सेटच्या विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरचे मार्गदर्शन करत आहेत.