नेट कार्यशाळा
शुक्रवार दि. २ एप्रिल ते सोमवार दि. १२ एप्रिल २०२१ या कालावधीमध्ये संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी नेटच्या दुसऱ्या पेपरसाठी मराठीमधून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना १२ पेपरचा संच देखील सोडवण्यासाठी देण्यात आला. ही कार्यशाळा रोज सायं. ६.३० - ८.०० या वेळात झूममार्फत घेण्यात आली. संस्कृत या विषयासाठी अशी कार्यशाळा घेणारे "स्वरमाधव फाऊंडेशन" हे प्रथमच आहे. १० विभागांमधील विषय ११ विभागांमध्ये विभागले होते आणि प्रत्येक विभागासाठी पुणे, मुंबई येथील त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रसिद्धीमाध्यमांनी सुद्धा या कार्यशाळेला प्रसिद्धी दिली. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.