पितृपक्ष और श्राद्ध
पक्ष पंधरवड्याच्या निमित्ताने “पितृपक्ष और श्राद्ध” या विषयावर ५ दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. देश विदेशातून या व्याख्यानाला श्रोत्यांची उपस्थिती असून या विषयावरील अजून व्याख्याने आयोजित करावी अशी श्रोत्यांनी इच्छा दर्शवली. डॉ. मिता शहा यांनी संस्कृत विषयातून एम्.ए. आणि एम्.फिल. केले असून "श्राद्ध : एक आधुनिक दृष्टिकोन" या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत विभाग येथून पीएच.डी. केली आहे. रेकी, योग तसेच पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपिस्ट म्हणून मिता शहा कार्यरत आहेत. "Science of Last Rites" (श्राद्ध कर्मों का विज्ञान) या नावाने त्यांचे पुस्तक प्रकाशित झालेले आहे.