संस्कृत व्याकरण वर्ग

सर्वांमध्ये संस्कृतबद्दल गोडी निर्माण व्हावी व शालेय विद्यार्थ्यांना गुणप्राप्तीसाठी अधिक उपयोग व्हावा या हेतूने १० दिवसांच्या “संस्कृत व्याकरण वर्गा”चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय मुलांसोबतच संस्कृतप्रेमी सुद्धा सहभागी झाले होते. सौ. ऋजुता फडके या रत्नागिरी येथील असून त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत विभाग येथून संस्कृत विषयातून एम्.ए. केले आहे. सध्या त्या रत्नागिरी येथे संस्कृत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.