प्राकृत भाषा व इतिहास : ओळख
आज लोप पावत चाललेल्या, ज्यातून आजच्या भारतीय भाषांची निर्मिती झाली त्या प्राकृत भाषेची जनसामान्यांना ओळख व्हावी म्हणून “प्राकृत भाषा व इतिहास : ओळख” या नावाने तीन दिवसीय ऑनलाईन स्वरूपात ४ कार्यशाळा घेण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून या कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. अत्यंत माफक फी घेऊन या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. ३०० पेक्षा अधिक लोकांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवला.